आय.सी.टी वर्ग १० वा
रिकाम्या जागा भरा
१. VA N म्हणजे Value Added Network
२. Electronics Commerce म्हणजे इंटरनेटचा समावेश करून वस्तूची खरेदी-विक्री, सेवा आणि माहितीची देवाणघेवाण करणे होय.
३. मराठीसाठी मंगल फॉण्ट चा वापर केला जातो
४. अलजेब्रा व्हू या भागात ग्राफिक view संबंधीत गणितीय क्रिया व समीकरणे दिसतात
५. आंतरकोन मोजण्यासाठी'वापरले जाणारे साधन Angel आहे.
६. विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या प्रगतीने माहितीच्या वेग वाढला आहे.
७. भारतीय रेल्वे, आयुर्विमा महामंडळ यांसारख्या शासकीय संस्थांनाही आपल्या गरजांनुसार संकेतस्थळे वेबसाइट विकसित केली आहे.
८. अनेक देशांनी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाला त्यांच्या विकास योजनेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे.
९. WWW म्हणजे वर्ल्ड वाइड वेब (World Wide Web)
१०. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या जडणघडणीमध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची भूमिका माहिती संप्रेषण तंत्रज्ञान साक्षरता वाढवणे ही आहे.
११. शासकीय संस्थांना व्हिडियो कॉन्फरसिंग सेवा राष्ट्रीय माहिती केंद्रामार्फत पुरवली जाते
१२. ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये शिक्षणाला अन्यनसाधारण महत्त्व आहे.
१३. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे माहिती प्रसारित करणे, साठवणे, तयार करणे, माहितीचे आदानप्रदान करणे यांसाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान
१४. आयसीटी हे Information Communication Technology चे संक्षिप्त रूप आहे.
१५. Administrators हे Modarators म्हणूनही काम सांभाळतात
१६. विषय (टॉपिक्स) थ्रेडस नावाने ओळखले जातात
१७. फोरमच्या दृश्य स्वरूपास स्किन म्हणतात
१८. VOIP तंत्रज्ञानांतर्गत इंटरनेट च्या मदतीने ध्वनीचे स्थानांतरण केले
१९. VOIP दूरध्वनीवरील ध्वनीलहरींचे डिजिटल सिगनलमध्ये रूपांतर करतो व सिग्नल्स आंतरजालाद्वारे पाठविले जातात
२०. ब्लॉग हा शब्द वेब लॉगपासून पासून बनला आहे.